8 मार्च जागतिक दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम
schedule05 Mar 25 person by visibility 399 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 6 ते 8 मार्च 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गुरुवार, दि.6 मार्च 2025 रोजी रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दुपारी 3 वाजता आरोग्य व स्वच्छता विभागाकडील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.7 मार्च 2025 रोजी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांकरीता केएमसी कॉलेज येथे सायंकाळी 4 वाजता अंतर्गत तक्रार समितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि.8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनादिवशी केएमसी कॉलेज येथे सकाळी 10 ते 1 पर्यंत महापालिकेच्या सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उखाणा स्पर्धा, नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी महापालिकेच्या सर्व विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.