SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शाळा संकुल प्रभावी व्यवस्थापनकोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुण गौरव सोहळा उत्साहात सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिषद उत्साहात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा : शिक्षणाधिकारी मीना शेंडकरकोल्हापूर ते नागपूर १५ मे पासून विमानसेवेला सुरूवात; खासदार धनंजय महाडिक यांची माहितीइतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत कार्यशाळा व कृत्रिम बुध्दिमत्ताबाबत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्नन्यू इंग्लिश स्कूल कुरुकलीचे सहाय्यक शिक्षक बी. बी. देसाई यांचा सेवापूर्ती सन्मान, शुभेच्छा समारंभ उत्साहात जलसंपदा विभागाने जलस्त्रोत निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा : अभिजीत म्हेत्रेईद फेस्टीवलच्या वतीने सोमवारी इस्लामिक आरा या पुस्तकाचे मौलाना सलाउद्दीन सैफी यांचा हस्ते प्रकाशन, व्याख्यान लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री : ‘मौरीटेक’चे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांचे प्रतिपादन

जाहिरात

 

'साप्ताहिक'करवीर काशी'चे यशस्वी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

schedule11 Jan 24 person by visibility 333 categoryसामाजिक

कोल्हापूर : नि:पक्ष आणि निर्भीडपणे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, तसेच सर्व चांगल्या चळवळींचे निर्भीड मुखपत्र म्हणून वाचकप्रिय झालेल्या साप्ताहिक करवीर काशी ने आपल्या दमदार वाटचालीतील २४वर्षें पुर्ण केली आहेत.  १जानेवारी २०२४ रोजी रौप्यमहोत्सवी २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण करणाऱ्या 'करवीर काशी'ला वाचक व वर्गणीदार यांनी आजपर्यंत नेहमीच लोकाश्रय दिला आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या करवीर काशी ने नेहमीच सडेतोड, निस्पृह व निर्भीडपणे लिखाण करून असंख्य वाचकांचा दुवा घेतला आहे.

 आजवर करवीर काशी च्या दिवाळी अंक व खास विशेषांकाचे महाराष्ट्रातील असंख्य वाचकांनी भरभरून स्वागत केले आहे. तर अनेक राज्यस्तरीय संस्थांनी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ध्येयवादी व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आजपर्यंत केलेल्या आदर्श अशा पत्रकारितेचा व प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या करवीर काशी च्या वाटचालीचा असंख्य वाचकांनी प्रतिसाद देऊन 'करवीर काशी ' आणि 'वाचक' यांचा भावबंध जपत एकात्मता दाखवली आहे. 

     रौप्यमहोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या करवीर काशी च्या वर्धापन दिनानिमित्त अनेक वाचकांनी व्हाट्सअप, ट्विटरवर व पत्राद्वारे ही संस्थापक संपादक डॉ.सुनीलकुमार सरनाईक यांचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes