SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिस

जाहिरात

 

कळंबा परिसरात गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; दोन लहान मुलांसह चौघे गंभीर; कंपनी विरोधात संताप

schedule26 Aug 25 person by visibility 679 categoryगुन्हे

कोल्हापूर : कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सोमवार रात्री 11 च्या सुमारास घरगुती गॅसमध्ये स्फोट् झाला. यामध्ये दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले.

शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुद्धा थेट गॅस पाईपल्याने गॅस पुरवठा सुरू आहे. सोमवार रात्री अकरा वाजण्याची सुमारास येथील शितल भोजने यांच्या घरामध्ये  गॅसमधून अचानक स्फोट  झाला. यामध्ये त्यांच्यासह एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले. अनंत भोजणे (वय ६०), शीतल अमर भोजणे (२९), प्रज्ज्वल अमर भोजणे (साडेपाच वर्षे) आणि इशिका अमर भोजणे (३) अशी जखमींची नावे आहेत.

घरामधील साहित्याची नुकसान झाले आहे. स्फोट झाल्याने खिडक्यांच्या काचाही फुटले आहेत.  घरातील बसण्यासाठी असणारा कोच सुद्धा जळाला आहे. याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. स्थानक प्रमुख जयवंत देशमुख यांच्यासह जवान येथे आले. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes