SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘जिल्हा युवा महोत्सव २०२५’ साठी युवकांना ४ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन नोंदणीचे आवाहनमुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी!तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदकगांधीनगर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्यास अटकवारी परिवार मंगळवेढा यांचे शाश्वत प्रतिष्ठानतर्फे स्वागतइचलकरंजीतील कुख्यात 'एसएन गँग' वर 'मोक्का' अंतर्गत कारवाई भाजपकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करावेत; भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे आवाहनसंतापजनक! १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार, नराधमाला अटककागल उरुसासाठी के.एम.टी. ची विशेष बस सेवाकागल येथील उरुसात ८० फुटांवर जॉइंट व्हील पाळणा अडकला; तब्बल चार तास सुटकेचा थरार,१८ जणांची सुखरूप सुटका

जाहिरात

 

साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघास सर्वसाधारण विजेतेपद

schedule29 Nov 24 person by visibility 543 categoryक्रीडा

 कोल्हापूर  : आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटी गुंटूर आंध्र प्रदेश येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या शिवाजी विद्यापीठ महिला संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ पदकासह सर्वसाधारण विजेतेपद (Winner Championship) पटकाविले.

 त्याचबरोबर सर्व दाही खेळाडूंची निवड सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली.

 सर्व खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी. टी.शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी. सी. पाटील, रजिस्ट्रार डॉ. व्हि. एन. शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, प्रशिक्षक डॉ. प्रशांत पाटील व डॉ. रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. 

 यशस्वी खेळाडू - काजल सरगर - सुवर्ण पदक 
भूमिका मोहिते - रौप्य पदक 
निकिता कमलाकर - कास्य पदक 
सरिता सावंत - चतुर्थ 
 राजनंदिनी आमणे - चतुर्थ 
 प्राजक्ता साळुंखे - पाचवी 
साक्षी संदुगडे - सातवी 
 अपेक्षा ढोणे - आठवी 
राजलक्ष्मी पवार - बारावी 
स्नेहा आमणे - चौदावी

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes