SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूरहिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत सांगता दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण आजची गरज: डॉ. विलास शिंदे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करुया : जिल्हाधिकारी अमोल येडगेकितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच: डॉ. जब्बार पटेलदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटपभुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजनराज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज कराउखळु धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी; हिरवागर्द निसर्गसौंदर्याची पर्यटकांना साद...

जाहिरात

 

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

schedule18 Jul 25 person by visibility 217 categoryराज्य

कोल्हापूर : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचे अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच दि. 20 जुलै  पासून दि. 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणारा आहेत. 

अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे या
विषयी जनजागृती तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहीत वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

27 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयाने गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रु. 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes