हिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत सांगता
schedule18 Jul 25 person by visibility 188 categoryसामाजिक

कोल्हापूर : सकल हिंदू समाजाच्या न्याय हक्कासाठी हिंदुजनसंघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भिडे गुरुजींचे यांच्या हस्ते उपोषणकर्ते संदीप सासने, राजेंद्र तोरस्कर आणि सुनील सामंत या तिघांना सरबत देऊन उपोषणाची ११ अकराव्या दिवशी सांगता झाली .
सकल हिंदू समाजाच्या विविध मागण्याची राज्य शासनाने दखल घेतली आहे. दिल्लीत भगवा झेंडा फडकवल्यावरच या छत्रपती शिवरायांच्या पासून सुरुवात केलेल्या लोक लढायची सांगता होईल असे भिडे गुरुजी यांनी घोषित केले .
हिंदू जनसंघर्ष समितीचे समन्वयक गजानन तोडकर यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर , आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत बैठका घेऊन सकल हिंदू समाजाच्या ३१ मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून सकारात्मक चर्चा झाल्यानं उपोषणाच्या सांगतेचा निर्णय घेण्यात आला आहे ' असे नमूद केले
यावेळी उदय बाबा भोसले, आनंदराव पवळ, अभिजीत पाटील, गजानन तोडकर, विक्रमसिंह जरग,सौरभ निकम ,विशुद्ध परीक्षेचे अनिल दिंडे शिवसेनेचे किशोर घाडगे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .