दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटप
schedule18 Jul 25 person by visibility 273 categoryसामाजिक

कोल्हापूर : युथ अँड सिनियर सिटीझन मंच, उमाशंकर सेवा ट्रस्ट, रंकाळा, चैतन्य पदपथ ग्रुप व सुरभी फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने, श्री स्वयंभु हायस्कूल व ज्यू कॉलेज, बोलोली, तालुका करवीर येथे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी युथ सिनियर सिटीझन मंचचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, सुरेखा डवर, रवींद्र निकम आणि सदस्यांच्या उपस्थितीत, शाळेतील 35 गरजू विध्यार्थी व विद्यार्थीनींना रेनकोटचे वितरण केले.
करवीर तालुक्यातील स्वयंभू वाड्यापैकी, मठाचा वाडा येथे कपडे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक खजानिस व माजी मुख्याध्यापक राजेंद्र मंडलिक , मुख्याध्यापक मोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. उपक्रमासाठी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आर्थिक सहकार्य केले होते.
या कार्यक्रमास सुधीर कुलकर्णी, राजश्री सूर्यवंशी, अरुण देशपांडे, आंजनेकर, सुरेशकुमार, शितल देशपांडे, कविता काळे, ए के कुलकर्णी, संगीता जरांडे आणि माधव पाटील यांचे सह शिक्षकेतर कर्मचारी व 350 पेक्षा जास्त विध्यार्थी उपस्थित होते.