SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या लाईनवर नागरीकांनी आपली नळ कनेक्शन शिफ्ट करावी; अन्यथा...तावडे हॉटेल येथील कमानीचा धोकादायक भाग आज उतविलाविद्यापीठात फूड बिझनेस जागृती कार्यशाळा उत्साहातमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनी मापन चाचणीएम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीची ‘चेतना’धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधनशिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपदपरदेश शिष्यवृत्तीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेतदिवाळी सुट्टीत कोल्हापुरातील सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरुमहिला लोकशाही दिन - 27 ऑक्टोबर रोजी

जाहिरात

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी

schedule16 Oct 25 person by visibility 124 categoryसामाजिक

कोल्हापूर  : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कोल्हापूर कार्यालयाने फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी घेतली. ही चाचणी दरवर्षी घेण्यात येते, ज्यात फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी केली जाते. यंदा सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध १५ हून अधिक एकटे व मालिका प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली.

यावेळी प्रादेशिक अधिकारी एमपीसीबी कोल्हापूर निखिल घरत, डॉ. चेतन भोसले, साइबर कॉलेज डीन डी. एस. माळी, निसर्ग मित्र अनिल चौगुले, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पीएसआय किरण कागलकर, पर्यावरण अधिकारी मनपा समीर व्याघ्रांबरे, डॉ. प्रिया पाटील, राजा हंसल उपस्थित होते.

ही चाचणी फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी ही पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत अनिवार्य आहे. केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) ने फटाक्यांसाठी ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे. एका फटाक्याची ध्वनी पातळी ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल (डीबी) पेक्षा जास्त नसावी. फटाके उत्पादकांनी उत्पादित फटाके ध्वनी मर्यादेत आहेत की नाही हे तपासणे हा प्रमूख उद्देश असतो. जर मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अतिरिक्त ध्वनीमुळे कानाचे नुकसान, तणाव, हृदयरोग आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो.

ही चाचणी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते.  एमपीसीबी ही चाचणी पोलिस आणि इतर विभागाच्या सहकार्याने घेते. सर्व सुरक्षा विचारात घेऊन चाचणीत १८ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यात लहान मोठे फटाके आणि बॉम्ब्स सारख्या फटाक्यांची तपासणी झाली. चाचणीनंतर अहवाल मुंबईतील सीपीसीबी मुख्यालयाकडे पाठवला जातो, ज्यातून उल्लंघन करणाऱ्या ब्रँडवर बंदी किंवा कायदेशीर कारवाई होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes