तावडे हॉटेल येथील कमानीचा धोकादायक भाग आज उतविला
schedule16 Oct 25 person by visibility 133 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा धोकादायक भाग आज महापालिकेच्यावतीने कटरच्या व इतर साधनसामग्रीच्या सहाय्याने उतरविण्यात आला. या प्रवेशद्वारावरील कमानीस प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दोन दिवसापुर्वी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. सदरच्या कमानीला सध्या २७ वर्षे पूर्ण झाली असल्याने महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार आज यातील धोकादायक असलेला भाग निष्कासीत करण्यात आला. तसेच तावडे हॉटेल कमानीच्या आतून गेलेली मुख्य विद्युत वाहिनीची केबल काढण्यात आली.
हि कारवाई 1 जेसीबी, 2 डंपर व 1 बुमच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी अत्यंत धोकादायक असलेला भाग काढून टाकण्यात आला. शहरात येणारी मुख्य महामार्गावरील वाहतूक शहराच्या अन्य मार्गाने वळवावी लागणार आहे. तसेच या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असलेने सदरची उर्वरीत कारवाई पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशात आडकर, सहा.अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सर्व्हेअर शाम शेटे, दत्ता पारधी व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.