ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट
schedule29 Oct 25 person by visibility 71 categoryराज्य
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे.
संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोरस रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड /रुधेनियम ऑक्साइड कोटींग फॉर एनर्जी स्टोरेज अॅप्लिकेशन’ या विषयावर हे संशोधन करण्यात आले. पुढील २० वर्षांसाठी मिळाला असून, या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना ऊर्जा संचयासाठी नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे.
ही नवीन प्रक्रिया ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सुपरकॅपेसिटर आणि बॅटरीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम 'थिन फिल्म्स' विकसित करण्यासाठी वापरली जाईल. ही पद्धत सिलार रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आली असून, ती तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक आहे. उर्जा क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.
या संशोधन कार्यात मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. अजिंक्य बगडे, डॉ. दिव्या पवार, ज्योती थोरात आणि डॉ. अभिषेक लोखंडे यांचा सहभाग होता.
या संशोधनासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.