कोल्हापूर महानगरपालिका : प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु
schedule29 Oct 25 person by visibility 103 categoryमहानगरपालिका
▪️प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. महानगरपालिकेकडून या कामासाठी सर्व सहा.आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी, तर उपशहर अभियंत्यांना सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रभाग निहाय मतदार यादी विभाजन कार्यक्रमाअंतर्गत आज दुपारी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी प्रभाग क्रमांक 20 व 9 फुलेवाडी रिंगरोड या परिसरात जाऊन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी पर्यवेक्षक व बीएलओ यांना त्यांनी आवश्यक त्या सुचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, सामाजिक वेशषतज्ञ युवराज जबडे, सर्व्हेअर शाम शेटे, कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर व पर्यवेक्षक उपस्थित होते.
प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी विभागनिहाय भाग संबंधित विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आले असून, त्यावर कंट्रोल चार्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये आज विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, नविन वाशीनाका चौक, आयोध्या कॉलनी, गंगाई लॉन, फुलेवाडी, आहिल्याबाई होळकर स्मारक परिसर. विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत रंकाळा परिसर, पंचगंगा हॉस्पीटल परिसर. विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी अंतर्गत रेल्वे फाटक परिसर, विक्रमनगर, टेंबालाईवाडी परिसर, चित्रनगरी, विद्यापीठ परिसर, शाहू टोल नाका, राजेंद्रनगर व विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट अंतर्गत पितळी गणपती समोर, आरटीओ ऑफीस परिसर, मार्केट यार्ड, बापट कॅम्प, सर्किट हाऊस मागे, मुक्त सैनिक वसाहत, देशमाने कॉलनी, सदरबाजार, गोल्डजिम या परिसरात सर्व्हेक्षण करण्यात आले. यावेळी सहा.आयुक्त कृष्णा पाटील, जयंत जावडेकर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सागर शिंदे, अक्षय आटकर, मीरा नगीमे, सर्व्हेटर श्याम शेटे, दत्ता पारधी, पर्यवेक्षक व बीएलओ उपस्थित होते.
तरी बीएलओ व पर्यवेक्षक हे प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीशी संबंधित काम करणार असल्याने नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.