कोल्हापूर कलाकारांची निर्मिती असलेला ' प्रलय ' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित
schedule29 Oct 25 person by visibility 126 categoryमनोरंजन
कोल्हापूर : कशीश प्रोडक्शन निर्मित प्रलय हा मराठी चित्रपट सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असलेला, 'प्रलय' हा मराठी चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
'प्रलय' चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदूराव आवळे आणि सह-निर्मात्या ज्योती सरदार आवळे असून यांच्या कशिश प्रोडक्शन च्या निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
"जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर अत्याचार होतो तेव्हा न्याय मिळवण्याचा प्रयत करताना तो आपल्या सिस्टीम द्वारे दबला जातो त्याला न्याय मिळत नाही तेव्हा त्यांकडे दोनच पर्याय शिल्लक असतात एक म्हणजे या सिस्टम च्या दबावाखाली चिरडून मरायच नाही तर उठायचं एक प्रलय बनून..! असाच एक प्रश्न प्रलय चित्रपट आपल्यासमोर घेऊन येतोय..! " तर पहायला विसरू नका मराठी चित्रपट प्रलय!
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे असून, दिग्दर्शन सचिन तुकाराम वारके यांनी केले आहे. छायाचित्रकार म्हणून अभिषेक शेटे यांनी काम पाहिलं आहे तसेच चित्रपटाची कथा हिरालाल कुराणे यांची आहे, तर पटकथा-संवाद, गीते आणि नृत्यदिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. अन्य गीते बळवंत आतिग्रे यांनी लिहिली आहेत.
चित्रपटाची प्रमुख भूमिका: चित्रपटात जेष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, आदित्य कुंभार, संतोष कसबे, आयुब इंगळीकर, उमेश बोळके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे, प्रभाकर वर्तक, तुषार कुडाळकर,सचिन मोरे,शिवाजी पाटील, दीपक खटावकर, विजयन्त शिंदे, पारस सोळंकी, समीर पंडितराव, ओम वेसनेकर यांसारख्या कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, प्रसिद्ध सेलिब्रिटी सुवर्णा काळे यांचाही विशेष सहभाग या चित्रपटात आहे.
तांत्रिक बाजू: चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन आदित्य कुंभार आणि नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. संकलन शेखर गुरव यांचे असून, कला दिग्दर्शन अनुकूल सुतार यांचे आहे. संगीत संयोजन ऐश्वर्य मालगावे यांनी केले आहे, तर पार्श्वसंगीत (BGM) शशांक पवार यांनी दिले आहे. राधाई डिजिटल स्टुडिओ मध्ये पुनः ध्वनीमुद्रण झाले असून, ध्वनी संयोजन निलेश निकम यांनी पाहिले आहे. VFX he संदीप कांबळे यांनी तर पोस्टर डिझाइन राज पाटील यांची आहे. चित्रपटासाठी दादू संकपाळ आणि दीपक खटावकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.येत्या शुक्रवारी महाराष्ट्रा सह कोल्हापूरमध्ये रॉयल आणि आयनॅक्स रिलायन्स मॉल येथे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे .