कोल्हापूर : अग्रवाल ट्रेडर्सकडे एकल प्लॅस्टिक आढळून आलेने पाच हजार रुपये दंड; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां नागरीकांवर दंडात्मक कारवाई
schedule29 Oct 25 person by visibility 122 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शनिवार पेठ परिसरात आज एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यावेळी शनिवार पेठ परिसरातील अग्रवाल ट्रेडर्सची तपासणी करताना अंदाजे 50 किलो प्लॅस्टीकचा साठा दुकानात आढळून आला. त्यामुळे या व्यापाऱ्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने या व्यापा-यास रु.5000/- चा दंड करुन तो वसूल केला.
त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेस बाधा आणणारा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या आस्थापना, व्यवसायिक व नागरिकांवर महापालिकेच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आज आंबेवाडी येथील क्लासिक मिसळ या व्यावसायिकाने पिकनिक पाँईट समोर उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्याला रु.1000/- चा दंड केला.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या सूचनेनुसार शहर समन्वयक मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, शुभांगी मॅडम, सुरज घुणकीकर, सुशांत कांबळे यांनी केली.
तरी शहरातील सर्व विक्रेत्यांनी आपला दैनंदिन कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या (घंटा गाडी) वाहनांकडेच देणेचा आहे. अन्यथा सदरचा कचरा इतरत्र उघड्यावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.