+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule08 Dec 22 person by visibility 1352 categoryदेश
नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या आरोग्य सुविधेबद्दल तसेच अतिउंचीवर प्रवास करण्यासाठी असलेल्या साधनांच्या सुरक्षेबाबत आणि पायाभूत सुविधांच्या पूूर्ततेबाबत, आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. यात्रेकरूंच्या सुखद आणि सुलभ प्रवासासाठी रोप वे ची सुविधा लवकरच पूर्णत्वास जाईल. तसेच यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे भरत असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 चारधाम यात्रेतील चार तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्हयातील यमनोत्री आणि गंगोत्री, रूद्रप्रयाग जिल्हयातील केदारनाथ आणि चमोली जिल्हयातील बद्रीनाथ... हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी जातात. अतिउंचावर ऑक्सिजनची कमतरता असते. शिवाय हवेचा दाब कमी असतो. अतिनिल किरणांची तीव्रता वाढलेली असते. अशावेळी या चारही तीर्थक्षेत्रावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा वाढवल्या, तर यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांनाही लाभ होईल, असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत नमुद केले. त्यावर केंद्रीय पर्यटन मंत्री अजय भट यांनी खुलासा केला.

 दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी पर्यटन मंत्रालयाकडून आरोग्य विभागाशी संपर्क साधला जातो. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू केली जातात. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चोख व्यवस्था असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राज्यसभेत बोलताना आज खासदार महाडिक यांनी चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या प्रवास व्यवस्थेविषयी सुध्दा मुद्दा उपस्थित केला. यमनोत्री किंवा केदारनाथला जाण्यासाठी पायी चालत किंवा घोडयावरून अथवा डोलीतून जाण्याचे पर्याय आहेत. मात्र डोली वाहणार्‍या गोरगरीब मजुरांची अवस्था अत्यंत बिकट असते. तर ज्या जनावरांवरून प्रवास केला जातो, त्यांची शारिरीक अवस्था सुध्दा बर्‍याचदा चांगली नसते. या जनावरांना पोटभर खाणेपिणे मिळत नसल्याने, गेल्या वर्षभरात सुमारे ६०० जनावरांचा मृत्यू झालाय. 

अशावेळी केंद्र सरकारकडून केदारनाथ आणि यमनोत्रीसाठी रोप वे सुरू होणार आहे का, आणि होणार असेल तर तो कधी सुरू होईल, याबद्दलची माहिती देण्याची खासदार महाडिक यांनी विनंती केली. त्यालाही पर्यटन मंत्री अजय भट यांनी समर्पक उत्तर दिले. सन २०१३ च्या केदारनाथमधील प्रलयंकारी महापूरानंतर, केंद्र सरकारने झपाटयाने दळणवळणाच्या सुविधा वाढवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून असून, चारधाम यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केदारनाथ आणि हेमकुंडसाहीब या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी केंद्र सरकारकडून रोप वे ची सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळं चारधाम यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्‍वास केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.