SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीरचे रामकृष्ण पाटील शिरोळचे दरगु गावडे पन्हाळयाचे श्रीनिवास पाटील तर कागलचे ॲड दयानंद पाटील कॉग्रेसच्या तालूका अध्यक्षपदी निवड; औद्योगक सेलच्या अध्यक्षपदी अनुप पाटील यांची निवडसरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथराधानगरी येथे पारावरचा फराळ : केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावाशिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ताडीकेटीईच्या ३ डिप्लोमा व ५ डिग्री इंजिनिअरींगच्या कोर्सेसना एनबीएचे मानांकनशालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे मदतीचा प्रस्ताव सादर करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुंबईमधील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करावी : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेपी. एम. किसान योजना त्रुटी पूर्तता- पंधरवडा मोहिमेचे आयोजन

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव

schedule30 Oct 25 person by visibility 96 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या  प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.  प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.जाधव यांची नियुक्ती केली.

 दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस आज (गुरूवारी) झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली.  व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली.  प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी आज सायंकाळी डॉ.जाधव यांना प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले.  तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत मा.कुलपती कार्यालयाला कळविण्यात आले. प्रा.डॉ.ज्योती जाधव यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

डॉ.जाधव हया जागतिक आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक आहेत.  त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे.  शिवाजी विद्यापीठात नियमित प्र-कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाल राहणार आहे.

दरम्यान, आज सायंकाळी प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.ज्योती जाधव यांचे अभिनंदन व स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes