करवीरचे रामकृष्ण पाटील शिरोळचे दरगु गावडे पन्हाळयाचे श्रीनिवास पाटील तर कागलचे ॲड दयानंद पाटील कॉग्रेसच्या तालूका अध्यक्षपदी निवड; औद्योगक सेलच्या अध्यक्षपदी अनुप पाटील यांची निवड
schedule30 Oct 25 person by visibility 115 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्षांच्या निवडी गुरुवारी जाहीर केल्या. काँग्रेसच्या करवीर तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण पाटील, शिरोळ तालुकाध्यक्षपदी दरगु गावडे, पन्हाळा तालुकाध्यक्षपदी श्रीनिवास पाटील, कागल तालुकाध्यक्षपदी ॲड. दयानंद पाटील-नंद्याळकर यांची निवड करण्यात आली. तर कोल्हापूर जिल्हा औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अनुप आनंदराव पाटील यांची निवड केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू छत्रपती व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मान्यतेने या निवडी जाहीर करण्यात आल्या.
रामकृष्ण पाटील हे वरगणेचे ग्रामपंचायत सदस्य असून हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन आहेत. दरगु गावडे हे शिरोळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य व दत्त सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. श्रीनिवास पाटील हे यशवंत सहकारी बँकेचे माजी संचालक आहेत. तर कागलचे दयानंद पाटील हे ॲड. दयानंद पाटील-नंद्याळकर हे मंडलिक कारखान्याचे संस्थापक-संचालक असून सरपंच परिषदेचे माजी जिल्हा समन्वयक म्हणून काम केले आहे. तर अतुल महादेव पाटील ( महाराष्ट प्रदेश असंघटीत कर्मचारी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली
कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसची विचारधारा पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या विविध सेल आणि फ्रंटलसाठी पदभरती करत, जिल्हाभरामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा बळकट करण्याची सुरुवात या माध्यमातून केली आहे.