पी. एम. किसान योजना त्रुटी पूर्तता- पंधरवडा मोहिमेचे आयोजन
schedule30 Oct 25 person by visibility 84 categoryराज्य
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत असून प्रती हप्ता प्रती लाभार्थी 2 हजार रुपये या प्रमाणे आज अखेर २० हप्त्यांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. योजनेतील २१ वा हप्ता लवकरच वितरीत होणार असून विविध त्रुटीपूर्तता अभावी पात्र लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिल्ह्यात दिनांक ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ याकालावधीत विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे, मोबाईल क्रमांक बदलणे, तालुका/गाव बदल करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.
मोहिमे दरम्यान खालील सुचनाचे पालन करावे-
*ई-केवायसी प्रमाणीकरण करणे (e-kyc)-* प्रलंबित लाभार्थी संख्या- ५०६५, पी एम किसान मोबाईल ॲपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करून बायोमेट्रिक पद्धतीने ekyc करावी. यासाठी महा ई-सेवा केंद्र किंवा सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
▪️नव्याने नोंदणी करणे (self registration)- प्रलंबित लाभार्थी संख्या - २५, अलीकडचा ७/१२, फेरफार, पती-पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी - २०१९ पूर्वी जमीन धारणा असलेला फेरफार (file size २०० KB) पोर्टल वर अपलोड करावा व महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
▪️नवीन नोंदणी नाकारलेले अर्ज अद्यावत करणे-(Updation of self registration)-६५,७०६, ज्या लाभार्थ्यांनी नवीन नोंदणी केली असता अर्ज नाकारण्यात आला आहे त्यांनी Edit /updateselfregistration टॅब मधून अद्यावत करुन घेवून महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
*चुकीचा मोबाईल क्रमांक बदलणे-* प्रलंबित लाभार्थी संख्या-१,९८,७६२, पी एम किसान योजनेंतर्गत खाते ॲक्टिव असल्यास updatemobilenumber या टॅब मधून आधार लिंक मोबाईल क्रमांक अद्यावत करुन घ्यावा.
ॲग्रीस्टॅक- प्रलंबित लाभार्थी संख्या- २,१७,६१०, महा ई-सेवा केंद्रातून ७/१२, आधारकार्ड अपलोड करुन आपला फार्मर आयडी (farmer-Id) काढून घ्यावा.
*अपडेट मिसिंग इन्फॉरमेशन -* पी.एम.किसान पोर्टलवरील Farmers' Corner मध्ये "Update Missing Information" ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमधून शेतकरी स्वतः त्यांच्या पी.एम.किसान खात्यातील चुकीची अथवा अपूर्ण असलेली माहिती अद्ययावत करु शकतात. यामध्ये Land Transfer Post Feb 2019: (Purchased/ Gift/ Land Grant); Suspected Current and Previous Land Owner Report आणि Incomplete Previous Owner Details या कारणांस्तव लाभ स्थगित झालेल्या लाभार्थीची दुरुस्ती होईल. त्यांनतर तालुका कृषी कार्यालयास सध्याचा ७/१२, पती-पत्नी आधारकार्ड, जमिनीचा फेरफार, रेशनकार्ड, वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार व मृत्युपत्र ही कागदपत्रे जमा करावीत व नजिकच्या महा ई सेवा केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
▪️जिल्हा /तालुका /गाव बदल- प्रलंबित लाभार्थी संख्या-३६७०, आपला सध्याचा ७/१२ आणि फार्मर आयडी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जेणेकरून District and below correction LGD ह्या सुविधेनुसार अद्यावत करु शकतात. यासाठी जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
▪️बँक आधार सिडिंग करणे (Adhar seeding)-प्रलंबित लाभार्थी संख्या- ११,५३८, बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात DBT enbled असलेले खाते उघडावे यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
▪️भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे (land seeding)- प्रलंबित लाभार्थी संख्या-1562, भूमिअभिलेख नोंदी संबधित १-१८ कॉलम मधील माहिती अद्यावत करावी यासाठी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.
या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. पी. एम. किसान योजनेचा २१ वा हप्ता लवकरच वितरीत होणार असून त्यापूर्वी प्रलंबित बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी १५ नोव्हेंबर पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.