डीकेटीईच्या ३ डिप्लोमा व ५ डिग्री इंजिनिअरींगच्या कोर्सेसना एनबीएचे मानांकन
schedule30 Oct 25 person by visibility 94 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये शिकविण्यात येणा-या एकूण ५ पदवी इंजिनिअरींग व ३ पदविका कोर्सेसना ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन ’(एनबीए) चे मानांकन मिळाले आहे. डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरींग, डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी या पदवीका कोर्सेसना तसेच मेकॅनिकल इंजिनिअरींग, मॅन मेड टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल केमिस्ट्री, टेक्नीकल टेक्स्टाईल, फॅशन टेक्नॉलॉजी या पदवी कोर्सेसना मानांकन प्राप्त झाले आहे.
सन २००३ म्हणजे आगदी सुरवतीपासूनच डीकेटीईने एनबीए च्या प्रक्रियेत सातत्याने सहभाग नोंदविला असून डीकेटीईच्या सर्व अभ्यासक्रमांना एनबीएकडून मानांकन मिळाले आहे. डीकेटीईने सातत्याने शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच आउटकम बेसड एज्यूकेशन पध्दती राबविली आहे. संस्थेमध्ये ९० हून अधिक प्राध्यापक वर्ग डॉक्टरेट पदवी प्राप्त आहे त्याचबरोबर ६० हून अधिक प्राध्यापकांनी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केले आहे. जास्तीत जास्त विद्याशाखांना एनबीए मानांकन मिळविणारी डीकेटीई ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे.
एनबीएकडून उच्चपदस्थ समितीने संस्थेस भेट दिली व प्रत्येक अभ्यासक्रमांचे काटेकोरपणे मुल्यांकन केले. या भेटीमध्ये संस्थेतील अभ्यासक्रमातील घटक, अध्ययन, अध्यापन आणि मुल्यमापन, संशोधन, पायाभूत सुविधा आणि शिक्षण, विद्यार्थी सहभाग, व्यवस्थापन, नवीन उपक्रम आणि पध्दती या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी केली. तसेच संस्थेचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांचेशी संवाद साधला. संस्थेतील औद्योगिक क्षेत्राशी संस्थेचा असलेला संबंध, संशोधनात्मक कार्य व सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून होणारे कार्य याचा एनबीए समितीने विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला.
एनबीए ही कॉलेजिसना मानांकन देणारी स्वायत्त संस्था आहे. यांच्या वतीने शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तापूर्ण दर्जा तपासणीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया राबविली जाते. एनबीएने दिलेल्या मानंकनाला देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विशेष महत्वाचे स्थान आहे. या एनबीए समितीत भारतातील विविध नामांकित विद्यापीठ व संस्थेतील तज्ञांचा समावेश असतो.
एनबीए मानांकन ही डीकेटीईसाठी अभिमानाची बाब आहे. या एनबीए मानांकनामुळे विद्यार्थी,पालक,इंडस्ट्रीज व एकूण समाजालाच उत्कृष्ट शिक्षणांची हमी मिळाली आहे. असे गौरवोउदगार मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केले. या सर्व यशामध्ये संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी यांच्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्वस्त आणि संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा.डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही.आर. नाईक, प्रा. आर.के. वळसंग, सर्व डिन्स, विभागप्रमुख आणि समन्वयक यांचा सिंहाचा वाटा आहे.