SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ताडीकेटीईच्या ३ डिप्लोमा व ५ डिग्री इंजिनिअरींगच्या कोर्सेसना एनबीएचे मानांकनशालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे मदतीचा प्रस्ताव सादर करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुंबईमधील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करावी : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेपी. एम. किसान योजना त्रुटी पूर्तता- पंधरवडा मोहिमेचे आयोजनकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर एकरकमी प्रति टन ३४०० रूपये जाहीरकोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले“सरदार@१५० एकता पदयात्रा” उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकशिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन कालावधीत विद्यार्थी व युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

जाहिरात

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर एकरकमी प्रति टन ३४०० रूपये जाहीर

schedule30 Oct 25 person by visibility 162 categoryउद्योग

इचलकरंजी : हुपरी  येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने  सन २०२५-२६ या ३३ व्या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला विनाकपात एकरकमी प्रति टन ३४०० रूपये दर जाहीर करण्यात आला आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर साखर उताऱ्यातील वाढीनुसार जादा ऊस दर देण्यात येईल. 
संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे २०२५-२६ हंगामासाठी सुमारे २२ हजार ७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०२५ पासून कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे.

 कारखान्याकडून  ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात येते. अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.

तेंव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने  करण्यात आले  आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes