+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustराज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान adjustआ.पी.एन.पाटील यांची प्रकृती स्थिर; मान्यवर तसेच कार्यकर्त्यांनी तब्येतीबाबत घेतली माहिती adjustनगरोत्थानच्या रस्त्यावर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसांची मुदत adjustकोल्हापूर महानगरपालिका : नगरोत्थानमधील रस्त्यांच्या कामातील त्र्युटींमुळे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व जल अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस adjustपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन adjustखासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा adjustसंजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड adjustकोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, कारवर झाड कोसळले adjustसाई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकलेने पाच हजार दंड; मोरया, स्टार, जानकी हॉस्पीटल व ॲस्टर आधार हॉस्पीटलला दंडाची नोटीस adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, मृतदेह सापडला
1000679152
SMP_news_Gokul_ghee
schedule17 Apr 24 person by visibility 216 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दि. 16 ते दि. 30 एप्रिल 2024 या कालावधीत सामाजिक वंचित घटक (SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC) / आर्थिक दुर्बल घटक / घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ / दिव्यांग / एच.आय.व्ही. किंवा कोविड प्रभावित बालके इ. घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी RTE पोर्टलवर नमूद कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे.

 कालावधीनंतर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दि. 9 फेब्रुवारी 2024 नुसार बालकाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अल्पसंख्यांक शाळा वगळता अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकांतील बालकांना प्रवेश देण्यासाठी पात्र असतील, अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविण्यात येईल.

आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षण मधून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य)- ग्रामपंचायत/न.पा./ म.न.पा. यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राहय धरण्यात येईल

निवासी पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य)- रेशनिंग कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / वीज बिल / पाणी बिल / टेलिफोन बिल इ. यापैकी कोणतेही एकही कागदपत्रे नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा किमान 11 महिन्यांचा नोंदणीकृत भाडे करारनामा ग्राहय धरण्यात येईल, भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड (सर्व घटकांना अनिवार्य)- विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किवा आधार क्रमांक मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करु शकले नाहीत तर 90 दिवसांच्या आत बालकाचे / पालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. मात्र विहीत कालावधीत याबाबतची पूर्तता न झाल्यास संबंधित बालकाचा आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश रदद करण्यात येईल.

सामाजिक वंचित घटक यांच्यासाठी वडीलांचा / बालकाचा जातीचा दाखला / प्रमाणपत्र- उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसुल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा (वडीलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही,

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (1 लाख रु.पेक्षा कमी उत्पन्नाचा)- तहसिलदार यांच्याकडील प्रमाणपत्र / सॅलरी स्लिप / कंपनीचा किंवा मालकाचा दाखला (सन 2022-23 अथवा सन 2023-24 या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला) ग्राहय धरण्यात येईल. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही

घटस्फोटीत अथवा न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.

विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.

अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- अनाथ बालकांच्या बाबत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राहय धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

कोविड प्रभावित बालके (ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक यांचे निधन दि. 01 एप्रिल 2020 ते दि. 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले) यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे -1) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र. 2) कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय / पालिका / म.न.पा.. रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय / प्रयोगशाळा यांचा अहवाल

एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र - जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र

बालकाचे छायाचित्र- अर्ज करणा-या बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र इ. कागदपत्रांची आवश्यता आहे.