कोल्हापूर महानगरपालिका : पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेरील अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई
schedule15 Jan 25 person by visibility 210 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र.2 मार्फत आज पापाची तिकटी पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेर काढलेल्या अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी या ठिकाणी 1 हातगाडीही जप्त करण्यात आली. ही कारवाई 1 जेसीबी, 2 डंपर व 25 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदरची कारवाई सकाळी 10 वाजले पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती.
ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशानुसार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, शरद कांबळे, अतिक्रमण व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.