26 नोव्हेंबरला संविधान रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांनी व्हावे
schedule24 Nov 24 person by visibility 121 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मान्यवर, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी- शिक्षकवर्ग, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो खेळाडू, खेळातील संघटना, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट व नागरिकांनी 26 नोव्हेंबरला संविधान दिनी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
जिल्हयात संविधान रॅली सकाळी 8.30 वाजता बिंदू चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन होणार आहे.
पुढे संविधान रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोल्हापूर महानगरपालिका गंगाराम कांबळे यांची समाधी, पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून या मार्गे दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप होणार आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, एन.सी.सी., एन.एस.एस, स्काऊट गाईड, विद्यार्थी तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व निवासी शाळा व वसतिगृह विद्यार्थी विद्यार्थीनी पारंपारिक वेशभुषा परिधान करुन सदर संविधान रॅली मध्ये सहभागी होणार आहेत. विदयार्थ्यांकडे शासन निर्णयात नमुद केल्यानुसार संविधानिक मुल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्ये, इत्यादी फलक असणार आहेत.
जिल्ह्यातील महाविद्याल, शाळांमध्ये मैदानी खेळ संघ, लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशे उपलब्ध आहेत, सदर रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविण्यात यावा.