करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी पारदर्शीपणे; निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा मतदार संघ करवीर
schedule24 Nov 24 person by visibility 172 categoryराज्य
▪️चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार
कोल्हापूर : व्हॉट्स ॲप द्वारे "करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामध्ये २५५४ मतदान कोठून आले अशी खोटी बातमी फिरत आहे." त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करवीर यांनी खुलासा केला आहे.
मतदानादिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे नोंदविले गेलेले मतदान २ लाख ७६ हजार २२५ आहे आणि मतमोजणीद्वारे उमेदवारनिहाय जाहीर केलेले टपाली मतदानाची २५५४ ही आकडेवारी एकत्रित करून असलेले मतदान आहे. २५५४ मतदान हे टपाली मतदान आहे. त्यानुसार मा. निवडणूक आयोगास कळविलेली आकडेवारी प्रसिध्द करणेत आली आहे. व्हॉट्स ॲप द्वारे फिरणाऱ्या बातमीमध्ये चंद्रदीप नरके यांचे मतदान १३४५३८ दाखविले आहे ते चुकीचे आहे. त्यांना टपाली मतदानासह १३४५२८ इतके मतदान झालेले आहे व नोटाला झालेले मतदान ६७८ हे इव्हीएम मशीनवरील असून टपाली मतदानामध्ये नोटाला १० मतदान झालेले आहे. मतमोजणीचे कामकाज पुर्ण पारदर्शी पणाने उमेदवार प्रातिनिधी व निवडणूक निरीक्षक यांचे उपस्थितीत पार पाडलेले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलजवळ उपस्थित असलेल्या सर्व उमेदवार प्रतिनिधी यांना प्रत्येक फेरीचे फेरीनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पत्रक त्या-त्या वेळेला देण्यात आलेले आहे.
संबंधित खोट्या बातमीच्या अनुषंगाने उमेदवार राहुल पाटील यांचेशी दुरध्वनीद्वारे बोलणे झालेले असता त्यांनी सांगीतले आहे की, मतमोजणी पारदर्शीपणे झालेली आहे. फेरीनिहाय झालेले मतदान माझ्या मतमोजणी प्रतिनीधीनी मला अवगत केलेले आहे. त्यामुळे अंतिमरित्या जाहिर झालेल्या आकडेवारीबाबत माझी काही हरकत नाही. जी बातमी फिरत आहे तशी आमची कोणतीही तक्रार नाही. व्हॉट्स ॲप द्वारे फिरणारा संदेश कोणी दिलेला आहे हे समजून आलेले नाही असे कळविले आहे. तरी कुणीही अफवा पसरवू नयेत किंवा दिशाभूल करणेचा प्रयत्न करू नये.
तसे झाल्यास मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल असे वर्षा शिंगण, निवडणूक निर्णय अधिकारी २७५ करवीर विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.