झारखंड : हेमंत सोरेन 26 नोव्हेंबरला घेणार शपथ
schedule24 Nov 24 person by visibility 131 categoryदेश
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांचा नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा २६ नोव्हेंबरला होणार आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, आरजेडी नेते तेजस्वी यादव, डाव्यांचे दिपंकर भट्टाचार्य यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) च्या नेतृत्वाखालील आघाडीने झारखंड विधानसभा निवडणुकीत 56 जागांसह जबरदस्त विजय नोंदवून सत्ता राखली आहे, तर JMM-नेतृत्वाखालील आघाडीने 81 सदस्यीय विधानसभेत 56 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) अवघ्या २४ जागांवर समाधान मानावे लागले.