SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी पारदर्शीपणे; निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा मतदार संघ करवीर26 नोव्हेंबरला संविधान रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांनी व्हावेविधानसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात सर्वात मोठ्या आणि कमी फरकाने कोण जिंकले, जाणून घ्या, काही जागांचे निकाल ...उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर झारखंड : हेमंत सोरेन 26 नोव्हेंबरला घेणार शपथमनसेची शिवतीर्थवर सोमवारी महत्त्वपूर्ण बैठककोल्हापुरातील महायुतीचे आमदार खास विमानाने मुंबईला रवानामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना; मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणारमहायुतीचा महाजल्लोष!, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झारखंडच्या जनतेचा झामुमो- काँग्रेसच्या आघाडीला पुन्हा संधी

जाहिरात

 

महायुतीचा महाजल्लोष!, महाविकास आघाडीचा दारुण पराभव

schedule23 Nov 24 person by visibility 183 categoryराजकीय

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. काँग्रेस १६, उद्धवसेनेला २० तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.

महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. अद्याप मुख्यमंत्रिपदी कोण हे ठरले नसले तरी शपथविधी घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी  राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही  महाराष्ट्राला दिली आहे.

२०१४ मध्ये स्वबळावर लढताना १२२, तर २०१९ मध्ये शिवसेनेशी युतीत लढताना १०५ जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी महायुतीत लहान मित्रपक्षांसह १५२ जागा लढल्या आणि १३७ जिंकल्या. ९० टक्के जागा जिंकण्याचा विक्रम भाजपने केला आहे. शिंदेसेनेने ८७ जागा लढविल्या आणि ५८ जिंकल्या. त्यांचा स्ट्राइक रेट ६६.६६ इतका आहे. अजित पवार गटाने ६० पैकी ४१ जागा जिंकल्या. त्यांनी ६८.३३ टक्के जागा जिंकल्या.  मविआतील कोणत्या एका पक्षाला विरोधी पक्षनेतेपददेखील मिळणार नाही अशी अवस्था केली आहे.लोकसभा निवडणुकीत जोरदार यश मिळविलेली मविआ यावेळी कशीबशी पन्नाशीच्या जवळ पोहोचली आहे.

महायुती सरकारमधील निवडणूक लढलेले सर्व मंत्री जिंकले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांचा त्यात समावेश आहे. तर महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लाडकी बहीण, महिलांना एसटी प्रवासात सवलत, वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा वर्षाव, शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिल माफी, कापूस, सोयाबीनसाठीच्या भावांतर योजना अशा लोकाभिमुख निर्णयांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes