'गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना ८% लाभांश जाहीर
schedule10 Aug 25 person by visibility 399 categoryउद्योग

कोल्हापूर : ‘गोकुळ सलंग्न’ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली.
प्रास्ताविक भाषणात बोलताना चेअरमन सचिन पाटील यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभेसमोर सादर केला. संस्थेचे वसूल भांडवल रु.२६ कोटी २७ लाख, ठेवी रु.५७ कोटी ८० लाख, कर्ज वितरण रु.९२ कोटी ३ लाख, चालू नफा रु.३४ लाख १५ हजार, खेळते भांडवल रु.९४ कोटी ४५ लाख, वार्षिक उलाढाल रु.१७२ कोटी ८१ लाख, सभेत शेअर भांडवलावर ८% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेचा सुवर्ण महोत्सव निधी तरतूद, सभासदांसाठी ऐच्छिक विमा योजना सुरू करणे, संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व सुधारणा करणे, गोकुळ दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र सुरू करणे या विषय पत्रिकेवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन एकमताने मंजुरी देण्यात आली. या सभासदांच्या सहकार्यामुळेच संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली असून मंजूर केलेले निर्णय संस्थेच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या कर्मचारी व सभासदांचा सत्कार करण्यात आला. या सभेचे स्वागत व अहवाल वाचण सचिव संभाजी माळकर यांनी केले. आभार माजी चेअरमन राजेंद्र चौगले यांनी केले. या सभेवेळी संस्थेचे सभासद दिपक पाटील, मुकंद पाटील, पी.आर.पाटील, संजय पाटील, सचिन मगदूम, सुनिल पाटील, उत्तम पाटील, संभाजी पाटील, बाळासो मंडलिक यांनी अहवालावरती विषय मांडले.
यावेळी गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग कापसे, संचालक राजेंद्र चौगले, जयदिप आमते, रामचंद्र पाटील, गोविंद पाटील, तुकाराम शिंगटे, सुनिल वाडकर, संदेश भोपळे, सतिश पोवार, दत्तात्रय डवरी, अशोक पुणेकर, संचालिका माधुरी बसवर, गिता उत्तुरकर, पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच पतसंस्थेचे सभासद, कर्मचारी आदि उपस्थित होते.