रक्षाबंधनाचा स्नेह, सामाजिक बांधिलकीचा मातोश्री फौंडेशनचा सामाजिक उपक्रम
schedule10 Aug 25 person by visibility 151 categoryसामाजिक

कोडोली : मातोश्री फौंडेशन महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा सण कोडोली येथील आश्रमशाळेत स्नेहपूर्वक साजरा करण्यात आला. तानाजी केकरे व जयश्री केंकरे यांनी स्वतः आश्रमशाळेत जाऊन मुलांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली व त्यांना खाऊ वाटप केले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना “आश्रमशाळेतील मुलेच उद्याचे अधिकारी बनू शकतात, शिक्षण हीच खरी शक्ती आहे” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी मातोश्री फौंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सचिन मानकर , केकरे दांपत्याचा सहपरिवार, शाळेचे शिक्षक पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.