उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ
schedule10 Aug 25 person by visibility 180 categoryराज्य

कोल्हापूर : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा अभिनव उपक्रम असलेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार सन २०२४-२५ वितरण सोहळा सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे,
अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी दिली आहे.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे प्रमुख अतिथी असणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.