डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ८ विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह निवड
schedule19 May 25 person by visibility 101 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या पॉलीस्टर डिव्हीजनमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड झालेले विद्यार्थी विविध पदावर रुजू होणार आहेत.
रिलायन्स कंपनी टेक्स्टाईल आणि पॉलीस्टर उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीमार्फत आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन ८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रिलायन्स कंपनीमध्ये निवड झालेले डीकेटीई टेक्स्टाईल चे विद्यार्थी - विशाल जानकर, रत्नदिप मुधाळे, राहुल कसाले, कमलकिशोर चौधरी, अथर्व तोडकर, सचिन चव्हाण, अदित्य कांबळे व दर्शन देसाई.विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित कंपन्यामध्ये आकर्षक पॅकेजसह नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध करुण देण्यात डीकेटीई संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. असे मत संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी व्यक्त केले. इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरऍक्शनमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे इंटरनशिपच्या माध्यमातून कौशल्य विकसीत झाले असून, प्लेसमेंटच्या इंटरव्हयूवच्या वेळी ते आत्मविश्वासाने आपली गुणवत्ता सिध्द करत आहेत व यामुळे येथील विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये आपली छाप पाडत आहेत असे गौरवोउदगार याप्रसंगी मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी.अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.