आवाडे जवाहर कारखाना व डीकेटीई च्या सहकार्याने एआय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणार
schedule19 May 25 person by visibility 113 categoryउद्योग

इचलकरंजी : ऊस उत्पादक शेतकèयांच्या उत्पादनात वाढ हाेवून ताे समृध्द हाेण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास याेजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्राेक्त तंत्रज्ञानाची सखाेल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकèयांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळाेवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयाेजन केले जाते. या अंतर्गत कृत्रिम बुध्दिमत्ता या नविन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढ या विषयावर कारखाना कार्यस्थळावर परिसंवाद संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी, जवाहर कारखाना, डीकेटीई व व्हीएसआय पुणे यांचे सहकार्याने ऊस उत्पादनामध्ये वाढ हाेण्यासाठी सभासद शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कमेचे अनुदान दिले जाणार आहे. तर उर्वरीत 50 टक्के रक्कम पुढील 2 हंगामात येणाऱ्या ऊसाच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. तळंदगे च्या संपूर्ण क्षेत्रावर तसेच कारखाना कार्यस्थळावरही राबविणेत येणार आहे.
आमदार डाॅ. राहुल आवाडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी विविध ऊस विकास याेजनांची कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे सुरवातीपासून चालू आहे. सध्या सर्वच क्षेत्रात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे ऊस शेतीतही हे तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगीतले.
व्ही.एस.आय. पुणे चे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. ए. डी. कडलग यांनी, एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला गरजेप्रमाणे अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन हाेवून सेंद्रीय घटकांचा पुरवठा केल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून ऊस उत्पादनात 40 टक्के वाढ हाेते. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर हाेवून उत्पादन खर्चात 30 टक्केपर्यंत बचत हाेते. एआय तंत्रज्ञानामुळे मातीचा सामु, क्षारता, ओलावा, नत्र, स्ुरद, पालाश य हवामानातील बदलाची माहिती दर्शविणा-या अत्याधुनिक सेंसर मुळे पाणी, खत, कीड व राेगांच्या नियंत्रणाच्या नियाेजनामध्ये मदत हाेते. याकरिता सेंसरच्या संदेशाप्रमाणे शेतक-यांनी कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रगतशील शेतकरी माेहन नवले यांनी, एआयमुळे ऊस पिकाला आवश्यक घटकांची अचूक माहिती सेंसरद्वारे उपलब्ध हाेते. पण मिळालेल्या संदेशाप्रमाणे कार्यवाही वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे. जवाहर साखर कारखाना नेहमीच शेतकèयांना विविध ऊस विकास याेजनांच्या माध्यमातून मदत करीत असून ठिबक सिंचन, क्षारपड निचरा चर याेजना व ड्राेनद्वारे औषधे फवारणी या नवनविन तंत्रज्ञानाचा सर्वात अगाेदर अंमलबजावणी करून कालानुरूप ऊस उत्पादनाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पाेहचवत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. शाश्वत ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान हे सध्या काळाची गरज असून शेतकèयांचा सहभाग आणि प्रतिसाद ऊस उत्पादन वाढीसाठी महत्वाचा असल्याचे नमुद केले.
परिसंवादाचे दिपप्रज्वलन कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
परिसंवादात आजी माजी संचालक व सभासद शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. प्रास्ताविक जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे आणि सूत्रसंचालन सुभाष गाेटखिंडे यांनी केले. व्हाईस चेअरमन बाबासाहेब चाैगुले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.