पनवेल परिसरात भाजपच्या नेत्याच्या कारला अपघात
schedule18 May 25 person by visibility 210 categoryगुन्हे

मुंबई : भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाला पनवेल परिसरात अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाल्याचे समजते . सध्या त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हाजी अराफत शेख हे पनवेलच्या दिशेने प्रवास करत असताना, समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांचे वाहन त्यावर आदळले. यामध्ये त्यांना पायाला दुखापत झाली असून, वाहनाचेही नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत तपास सुरू केला आहे.