राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 30 व्यवसायांमध्ये 1388 जागेकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
schedule19 May 25 person by visibility 143 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : प्रवेशसत्र ऑगस्ट 2025 करीता संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे एकूण 30 व्यवसायांमध्ये 1388 जागेकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु झाली आहे.
याचे प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावेत. अर्ज स्विकृतीकरीता समक्ष येऊन अर्ज करावा,
असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.