कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य माहिती आयोगाचा आदेश बसविला धाब्यावर!
schedule19 May 25 person by visibility 221 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनमाहिती अधिकारी तथा कर अधिक्षक व प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त यांनी राज्य माहिती आयोग,खंडपीठ पुणे, यांनी दिनांक २२/४/२०२४ रोजी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असे निदर्शनास आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक करवीर काशी चे संपादक डॉ सुनीलकुमार सरनाईक यांनी १) जनमाहिती अधिकारी तथा कर अधिक्षक, घरफाळा विभाग, ए/बी, वि.का.क्र.१, गांधी मैदान, कोल्हापूर महानगरपालिका,
२) प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर. यांचेकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या अन्वये माहिती मागितली होती ती वेळेत दिली नाही, तसेच हवी ती समाधानकारक माहिती दिली नाही म्हणून राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांचे कडे अपिल करण्यात आले होते, सदर द्वितीय अपिलाची सुनावणी ३०/११/२०२३रोजी पुणे येथून झाली, या सुनावणीचा आदेश (क्र. रामाआ/ ३०६५/२०२१/कोल्हापूर, दि.२२/४/२०२४) दिनांक दि.०२/०५/२०२५ ई|| रोजी रजिस्टर पोस्टाने मिळाला. उपरोक्त आदेशान्वये तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा कर अधिक्षक यांनी सुमारे एक वर्ष झाले तरी ही उचीत कार्यवाही केलेली नसून माहिती अधिकार अधिनियम चा भंग केला आहे, शिवाय राज्य माहिती आयोग यांच्या आदेशाचा अवमान केला आहे.असे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे, तसेच प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त (२), कोल्हापूर महानगरपालिका, यांनी उपरोक्त आदेशान्वये तात्काळ योग्य ती अंमलबजावणी करणेबाबत कोणतीही दक्षता न घेता टाळाटाळ केली आहे,सबब राज्य माहिती आयोगाच्या आदेशाचा अवमान केला आहे, हे निदर्शनास आले आहे.
सबब राज्य माहिती अधिनियमाच्या कलम ७(१) चा भंग केला आहे, व राज्य माहिती आयोगाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सरनाईक यांनी राज्य माहिती आयोग, खंडपीठ पुणे यांचेकडे केली आहे.तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये कर अधिक्षक व उपायुक्त यांच्या वर कार्यालयीन चौकशी करून शास्ती आकारण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी १) आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर २)मा. विभागीय आयुक्त, विधान भवनासमोर, पुणे -४११००१, ३) मा. मंत्री, विधी व न्याय खाते, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई -४०००३२
४)ना.प्रकाश आबीटकर, पालक मंत्री, कोल्हापूर जिल्हा.
यांच्याकडे सदर आदेश व अर्जाची प्रतिलिपी पाठवण्यात आली आहे.