कोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाई
schedule07 Oct 26 person by visibility 146 categoryमहानगरपालिका
◼️५ हातगाड्या जप्त; दुकारदारांना बाहेर अतिक्रमण न करणेबाबत सक्त सुचना
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 2 (छ.शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आज कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण 5 हातगाड्यांवर कारवाई करून जप्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड स्वत: उपस्थित होते.
महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही जणानी स्वत:हून अतिक्रमण केलेले साहित्य काडून घेतले. तर स्थानिक दुकानदारांना दुकानाच्या बाहेर अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या जागेत विनापरवाना व्यवसाय अथवा अतिक्रमण करू नये असे आवाहनही यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशान्वये उपआयुक्त किरणकुमार धनवाडे व सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक, विभागीय कार्यालय क्र. 2 मधील कर्मचारी सहभागी झाले होते.