SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या निमित्ताने भाजपा कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमजागतिक कापूस दिन: महत्त्व, इतिहास आणि भारताची भूमिकामतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदीकोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणी

जाहिरात

 

समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे

schedule07 Oct 26 person by visibility 161 categoryसामाजिक

कोल्हापूर : समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंताची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी, लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते आज ‘वंचित घटक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा’ या विषयावर बोलत होते.

वंचितांच्या वेदना, संघर्ष आणि जीवनानुभव कलांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जातात, तेव्हाच समाज अधिक संवेदनशील आणि समतोल बनतो, असे सांगताना डॉ. शिंदे म्हणाले, कलावंत हा केवळ मनोरंजन करणारा व्यक्ती नसून तो समाजजाणिवा जागृत करणारा, प्रबोधन करणारा आणि सांस्कृतिक आरोग्य सांभाळणारा घटक आहे. सिनेमा, साहित्य, नाटक आणि कविता या माध्यमांतून दुर्लक्षितांचे प्रश्न मांडले गेले, तेव्हा समाजात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली.

डॉ. शिंदे यांनी भारतीय समाजातील वंचित घटकांच्या संघर्षाचा, विशेषतः महिलांच्या सामाजिक स्थितीचा आणि त्यांच्या आवाजाचा इतिहास उलगडून दाखवला. वंचित समाजाला अनेकदा उपेक्षा, अन्याय आणि मौन यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी कलावंतच त्यांच्या कथा, वेदना आणि मागण्या समाजापर्यंत पोहोचवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या महामानवांसह आचार्य अत्रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मीरा नायर, दीपा मेहता, शबाना आजमी, स्मिता पाटील, नंदिता दास आदी कलावंतांच्या योगदानामुळे वंचितांच्या वेदनांना व्यापक वाचा फुटली. स्त्रियांना शिक्षण, मतदान, स्वातंत्र्य आणि आत्मभान मिळवून देण्यात समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे सिनेमानेही वंचितांच्या जगण्याला दृष्यमान केले आणि समाजातील दडपल्या गेलेल्या आवाजांना वाचा दिली, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, आज दिवसभरात पुणे येथील चित्रशारदाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर यांनी ‘सिनेमातील लिंगाधारित पूर्वग्रह’ या विषयावर आणि चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी ‘वंचितांच्या चित्रपटांचे भवितव्य आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले.  

कार्यशाळेला विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती आणि चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिविभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव यांनी संयोजन केले. समन्वयक अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes