कोल्हापूर शहरातील चॅनल, क्रॉसड्रेन सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
schedule14 May 25 person by visibility 263 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नाले, चॅनल व क्रॉसड्रेन सफाई करण्यात येते. या नाले व क्रॉसड्रेन सफाईच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी शाहूपुरी व राजारामपुरी परिसरात सुरु असलेल्या नाले व क्रॉसड्रेन सफाईची पाहणी केली.
यावेळी सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, माजी नगरसेवक संजय मोहिते उपस्थित होते. राजारामपुरी येथील क्रॉसड्रेनच्या चॅनलमधून 9 फुटाचे लाकूड, 1 मोठा ओंढका व 1 टिप्पर पेक्षा जास्त कचरा व प्लॅस्टीक नाल्यातून काढण्यात आले. यामध्ये 9 फुटाचा ओंडका कटिंग करत करत बाहेर काढण्यात आला.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील मुख्य रस्ते व चौकातील क्रॉसड्रेन व चॅनलची पावसापुर्वी स्वच्छता पुर्ण करुन घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. तसेच शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक बॉटल अथवा इतर टाकाऊ पदार्थ नाल्यामध्ये, चॅनलमध्ये टाकू नये असे आवाहन केले आहे.