SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नावगुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागतहिंगोली येथील फरार आरोपी व साथीदाराकडून आंतरजिल्ह्यातील चोरीच्या 8 मोटर सायकली जप्तनिवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहावे नेपाळ येथील स्पर्धेत जानवी लोढाचे दुहेरी यश श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाची भारतीय गुणवत्ता परिषदे मार्फत तपासणीगोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील...अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशाराघोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

जाहिरात

 

...अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशारा

schedule16 May 25 person by visibility 271 categoryराज्य

▪️गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामावर अधिकारी धारेवर..
▪️गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठक....

कोल्हापूर : गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी 19 मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा त्यानी  दिला. याशिवाय ज्या गावांमध्ये या योजनेच काम सूरू आहे ते आजपासून बंद पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये  झाली.

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर  कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च उपकार्यकारी अभियंता डी.के. पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. 

आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांच्यासाठी ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी 343 कोटी 68 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे.. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचे काम करीत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. 27 महिन्याची मुदत असतानाही, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेलं नाही. यावरून, आमदार सतेज पाटील यांनी, या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. गेली तीन वर्ष या योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेलेल नाही. आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू. यापुढे काम सुरू करू देणार नाही. आम्ही कामं बंद पाडणार. असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून, योजनेच्या कामाबाबत दिरंगाई होत आहे. याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने, प्राधिकरणचा कारभार मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चालवत आहे काय. असे खडे बोल सुनावत,.
सोमवार पर्यंत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक लावून कामे सुरळीत करा. अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी 19 मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुमच गुणगाणं ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही. तुम्ही यामध्ये राजकरण आणणार आहात काय? 
लोकांचा उद्रेक झाला आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेले नाहीत, केवळ कागदोपत्री काम चालूआहे. आम्हाला तुमच्या समस्या सांगू नका.कामे वेळेत पूर्ण करा. मनुष्यबळ वाढवा. अशा सूचना त्यानी केल्या.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी, या योजनेला कोण वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड आम्हाला द्यावें लागत असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी, कंपनीने ठीक ठिकाणी पाईपलाईन साठी रस्ते उकरून ठेवले आहेत. पावसाळा आला आहे. त्यामुळे मोठा चिखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडी चे माजी सरपंच अमर मोरे, युवराज गवळी यांनी, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी, वेळेत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. या बैठकीला पाचगावच्या  सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कनेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी किरण आडसूळ, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचंगावच्या उपसरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्य सारिका माने, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes