हैदराबादमध्ये चारमिनारजवळ अग्नीतांडव, 17 जणांचा मृत्यू
schedule18 May 25 person by visibility 247 categoryदेश

नवी दिल्ली : तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये चारमिनारजवळ एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे.
हैदराबादच्या गुलजार हाऊसमध्ये पहाटे सहाच्या सुमारास आग लागली. ही आग इमारतीच्या तळ मजल्याला आग लागली आणि ही आग वरपर्यंत पसरत गेली. स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रुद्ररूप धारण केले होते आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 वाहने घटनास्थळी दाखल झाले होते या अपघातात आतापर्यंत दहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना DRDO, उस्मानिया जनरल हॉस्पिटल आणि एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.