भुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
schedule24 Oct 25 person by visibility 107 categoryराज्य
कोल्हापूर : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुका लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, भुदरगड येथे तालुकास्तर लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन भुदरगडच्या तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.