SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल येथील उरुसात ८० फुटांवर जॉइंट व्हील पाळणा अडकला; तब्बल चार तास सुटकेचा थरार,१८ जणांची सुखरूप सुटका हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय : राज्यपाल आचार्य देवव्रत‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटनफुटबॉल निवड चाचणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहनगोकुळ मार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा : नविद मुश्रीफपद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजराभुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागूसातारा हादरलं ! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट

जाहिरात

 

गोकुळ मार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा : नविद मुश्रीफ

schedule24 Oct 25 person by visibility 195 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्या वतीने यावर्षीही ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.

 दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करतो. यावर्षीची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दिनांक २० नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज करून दि. ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या म्हैशीने किमान १२ लिटर व गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

स्पर्धेबाबतच्या नियम व अटींची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे गोकुळ संघ दूध उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करीत असून, उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.


* बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes