सातारा हादरलं ! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट
schedule24 Oct 25 person by visibility 183 categoryगुन्हे
सातारा : साताऱ्यात उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. संपदा मुंडे असं महिला डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे. संबंधित महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. दरम्यान, याच त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचा निर्णय घेतला. महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.
डॉ. संपदा मुंडे असं महिला डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे. महिला डॉक्टरने परिसरातील हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या हातावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली.
महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'माझ्या आत्महत्या करण्यामागचं कारण पोलीस निरिक्षक गोपाळ बदने आहेत. त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला', असं महिलेनं हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
याबाबत संपदाचे काका यांनी सांगितले की 'माझ्या पुतणीनं हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. तिच्यावर कामाचा दबाव होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी काही लोकांकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अधिकाऱ्यांचा त्रास होतोय. मी आत्महत्या करेन, असंही पुतणी म्हणायची. डीवायएसपींकडे लेखी तक्रार देऊन लक्ष दिले गेले नाही' अशी माहिती डॉक्टर महिलेच्या काकांनी दिली.