कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
schedule04 Dec 24 person by visibility 130 categoryराज्य
मुंबई - दक्षिण भारतातील काही राज्ये फेंगल चक्रीवादळामुळे प्रभावीत झाली असून चक्रीवादळ आता अरबी समुद्रावर घोंगावत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील थंडीची लाट ओसरली असून सहा ते सात जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. तसेच पाच ते सात डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोकण गोव्यात रत्नागिरीत पाच तारखेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे.