महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस; आझाद मैदानावर उद्या शपथविधी होणार
schedule04 Dec 24 person by visibility 156 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उद्या शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचे पत्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी राज्यपाल यांना दिले. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे. असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद या केवळ तांत्रिक बाबी आहेत आम्ही तिघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित काम करणार आहोत असे फडणवीस यांनी सांगितले. आपण स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे. असे फडणवीस म्हणाले.
महायुतीला मोठा जनादेश मिळाला आहे केंद्र सरकारची ह आम्हाला साथ आहे आम्ही एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करू असं अजित पवार यांनी सांगितले
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नावाची शिफारस मुख्यमंत्री पदासाठी केली होती. आज आपण त्यांच्या नावाची शिफारस केली त्याचा विशेष आनंद आहे. असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत आपल्याला काय मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही करतो. असे शिंदे म्हणाले. अडीच वर्षे एकत्रितपणे महाराष्ट्रासाठी महायुतीने ऐतिहासिक काम केला आहे असे सांगत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन केले.