विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवारी
schedule04 Dec 24 person by visibility 120 categoryराज्य
कोल्हापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते.
या बैठकीत तीन महिन्यात समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.