SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणसार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीमकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 23 जून रोजी सभाअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनारराज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

जाहिरात

 

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार

schedule17 Jun 25 person by visibility 211 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :  शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करिता अभियांत्रिकी पदवी (प्रथम व द्वितीय वर्ष) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात येत्या शनिवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता प्रवेश  प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार तंत्रज्ञान अधिविभाग सभागृहात पार पडणार आहे. ही माहिती तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी दिली आहे.

या मार्गदर्शन चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी म्हणजे काय, अभ्यासक्रमाचे स्वरूप,  विविध शाखांची निवड कशी करावी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या अनुषंगाने होणारे बदल, भविष्यातील रोजगार व उच्च शिक्षणाच्या संधी, विविध स्कॉलरशिप, विद्यापीठाच्या विविध योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आदींविषयी समग्र मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप याविषयी माहिती देऊन शंकानिरसन केले जाईल. 

तंत्रज्ञान अधिविभागामध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे उच्चशिक्षण दिले जाते. पदवी स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एनव्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. अभियांत्रिकीमध्ये पी.एचडी. करण्याचीही संधी येथे उपलब्ध आहे.

या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारचा विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी  (०२३१ ) २६०९४२४ / २६०९४१४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कोळेकर यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes