SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणसार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीमकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 23 जून रोजी सभाअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनारराज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

जाहिरात

 

मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

schedule17 Jun 25 person by visibility 276 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भारत सरकारच्या अंतराळ संशोधन केंद्र इस्रो (ISRO) या संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या कुमारी जोया जमील बागवान या के.आय.टी. कॉलेजच्या विधार्थीनीचा सत्कार मुस्लीम बोर्डिंग येथे आयोजित करणेत आला होता. सदर विद्यार्थीनीला संस्थेमार्फत रु. २५०००/- इतकी रक्कम आर्थिक मदत प्रोत्साहन स्वरूपात देणेत आली.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी राजर्षी छ.शाहु महाराजांनी संस्थेच्या घटनेत केलेली अपेक्षा या रूपाने प्रत्यक्षात उतरली. मुस्लीम समाजातील मुलांनी व मुलींनी संशोधन क्षेत्रात उतुंग भरारी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष आदील फरास यांनी जोयाने फक्त इस्त्रोच नाही तर नासा सारख्या अंतरराष्ट्रीय संस्थेत भविष्यात संधी प्राप्त करावी अशी इच्छा व्यक्त केली. संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी प्रास्ताविक केले. सत्कारमुर्ती कुमारी जोया बागवान यांनी सत्काराबद्दल मुस्लीम बोर्डिंगचे आभार मानले.

 यावेळी संचालक हाजी लियाकत मुजावर, हाजी जहाँगीर अत्तार, रफीक शेख , मलीक बागवान, रफीक मुल्ला , उद्योगपती जावेद शेख (कांडेकरी), चाँदसो जत्राटे , रफीक मुल्ला (माजी नगरसेवक), गौसखान पठाण, हाजी रफिक बागवान ,  बापु मुल्ला, नेहरू हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे मुख्याध्यापक एस. एस. काझी व जोया चे आई वडील तसेच नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes