राज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली
schedule17 Jun 25 person by visibility 193 categoryसामाजिक

कोल्हापूर : कलासक्त स्टुडिओ ग्रुप सिंगिंग कराओके च्यावतीने दि ग्रेट शोमॅन राजकपूर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्त कराओके गाण्यातून श्रद्धांजलीचा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे ऋतुराज क्षीरसागर व अर्जुन नलवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी अर्जुन नलावडे यांनी राजकपूर यांच्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात स्व. भालजी पेंढारकर यांनी नारदाची भूमिका देऊन केली राजकपूर यांचा देशातील पुतळा कोल्हापूर आहे यासंह आठवणी कथन केल्या.
यावेळी संयोजक डी. एस. (दिनकर साळोखे) यांनी ग्रुप च्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली यावेळी ऋतुराज क्षीरसागर व किशोर घाटगे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झालेबद्दल अदिती उचगावकर यांचा व अमृता गलांडे यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, सह विविध कपूर घराण्यावर प्रेम करण्याऱ्या गायक, गायिकानी कपूर घराण्यातील नायक, नायकांची तब्बल ६३गाणी सादर केली यात ७५वर्षीय राजन कारंजकर व ७वर्षीय अन्विका घाटगे हिचा समावेश होता. नीलम काळे यांनी आभार तर मोहन लोंढे, अनुराधा लोंढे,अमित पाटील, समीर पटेल सुरेश पाटील, सचिन जाधव, अमृता गलांडे,संजय पाडदे, रश्मी चेटर्जी, मोहिते, निगवेकर, प्रकाश बासरांनी, अशोक लोहार, ऍड. संगीता तांबे, शीतल कांबळे,महेश कांबळे, प्रशांत पाटील, शक्ती देसाई, यासह कलाकारांनी गाणी सादर केली.