SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणसार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीमकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 23 जून रोजी सभाअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनारराज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

जाहिरात

 

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीम

schedule17 Jun 25 person by visibility 222 categoryराज्य

* राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर : तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवून, सार्वजनिक ठिकाणी, यात सर्व शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख तपासणी करून दंडात्मक कारवाई करतील. या विशेष मोहिमेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत निर्देश दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातील डॉ.विक्रम आरळेकर जिल्हा सल्लागार, चारुशीला कणसे मानसशास्त्रज्ञ, क्रांती शिंदे सामाजिक कार्यकर्ता, प्रियांका लिंगडे कार्यक्रम सहाय्यक यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

आता प्रत्येक शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकारी किंवा कर्मचारी, जे आस्थापनाविषयक कामकाज पाहतात, ते तंबाखू नियंत्रणाचे कामकाज पाहतील. त्यांना या मोहिमेत ‘दंड अधिकारी’ म्हणून ओळखले जाईल. कार्यालयात तसेच कार्यालयात येणाऱ्या बाहेरील व्यक्तीकडून तंबाखू सेवन आढळल्यास दंड अधिकारी संबंधितावर कारवाई करेल आणि दंड आकारेल. यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात यापूर्वी दंड पावती पुस्तिकांचे वितरण केले आहे. सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करताना आढळल्यास दोनशे रुपये दंड, तर शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आढळल्यास दुप्पट दंडासह प्रशासकीय कारवाई केली जाईल. तसेच, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्येही दंडाच्या पावती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना या दंडात्मक कारवाईबाबत उद्दिष्ट नेमून दिले जाणार आहे. याबाबत 23 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून, सर्व शाळा, शासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख आणि दंड अधिकारी यांनी तपासणी करून दंडात्मक कारवाई करणार आहेत.

गावपातळीवर आशा ताईंचा तंबाखूविरोधी मोहिमेत सहभाग वाढवून, त्यांना गावातील किमान एक पुरुष किंवा स्त्री तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शासकीय कार्यालय स्तरावर तंबाखूमुक्त कार्यालय मोहीम राबविली जाणार आहे. कार्यालयात तंबाखूचे सेवन आढळल्यास अशा व्यक्तींना समुपदेशन करावे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी अभियानातून जनजागृती करावी. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा विक्रीस प्रतिबंध नियमांची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यात तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्र 14 असून, त्याठिकाणी नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या एप्रिल ते मे 2025 या काळात 1108 इतकी आहे. त्यापैकी एकूण 157 जणांनी तंबाखू सेवन सोडले आहे. यासंदर्भात कॅन्सरग्रस्त संशयितांची संख्या 109 असून, त्यापैकी 3 जण कॅन्सरग्रस्त आढळले आहेत. कोटपा कायद्यांतर्गत या वर्षी एप्रिलपासून 124 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात आरोग्य विभागाने 5 हजार 340 रुपये, तर पोलीस विभागाने वीस हजार रुपये वसूल केले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes