SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; ७ लाख लाचेची मागणीग्राहक मेळाव्यातून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषितकृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा आज प्रारंभशिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंतीकोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी व्यावसायिक अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटेंट दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनतापमानात 14 जूनपर्यंत वाढ, काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

जाहिरात

 

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी सामंजस्य करार

schedule09 Jun 25 person by visibility 310 categoryसामाजिक

कोल्हापूर  :  युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. सद्यस्थितीत अनेक शहरांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होते. कृष्णराज महाडिक यांनी, ही समस्या ओळखून त्यावर  उपाय योजना करण्याचे ठरवले आणि वोलू या भारतातील पहिल्या व्यासपीठाशी सामंजस्य करार केला. 

प्रत्येक महिलेला स्वच्छतेचा आणि सन्मानाचा हक्क असावा, या विचारातून स्वच्छता गृहांची उभारणी केली जाईल. त्यातून महिलांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल, असा विश्‍वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला आहे. वोलू तंत्रज्ञानाचा वापर करून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुरक्षा, निगराणी, काटेकोर स्वच्छता, याबाबत लक्ष दिले जाईल. वोलू ही एक सामाजिक चळवळ असून,  तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी काम करते.

विशेष म्हणजे स्वच्छतागृहांची माहिती व्हावी, यासाठी विशेष ऍपची निर्मिती केली जाईल. त्यामुळे महिलांना जवळची स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची माहिती मिळेल. आजही हजारो महिलांना योग्य स्वच्छतागृह नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पण आता कृष्णराज महाडिक यांनी, महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि सुविधेसाठी कृतीशिल पाऊल उचलले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes