SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषितकृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा आज प्रारंभशिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंतीकोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी व्यावसायिक अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटेंट दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनतापमानात 14 जूनपर्यंत वाढ, काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेछत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटेंट

schedule09 Jun 25 person by visibility 146 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस झिंक आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स फॉर फोटोकेटालिटिक डाई डिग्रेडेशन” तंत्रज्ञानाला पेटंट मंजूर झाले असून विद्यापीठाला मिळालेले हे ५४ वे पेटंट आहे

डॉ. विश्वजीत एम. खोत यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आहे आहे. डॉ. केतकी व्ही. कदम आणि डॉ. अश्विनी. बी. साळुंखे यांचा या संशोधन कार्यत सहभाग होता. यामध्ये नव्या प्रक्रियेद्वारे उच्च सच्छिद्र झिंक आयर्न ऑक्साईड नॅनोकणांचे संश्लेषण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया रंगद्रव्य विघटन अधिक पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आलेली ही पद्धत तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

 संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांनी ही मान्यता विद्यापीठासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी असल्याचे सांगितले. हे पेटंट पुढील २० वर्षांसाठी विद्यापीठाच्या नावे संरक्षित राहणार आहे.

   या उल्लेखनीय यशासाठी सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes